Sunday, July 22, 2012

आर यु व्हर्जिन ?



आर यु व्हर्जिन ?

आपण नॉर्मल आहोत, हे सिद्ध करण्यासाठी मग तिनं
काय केलं असेल?
त्या चौघी मैत्रिणी. चावट गप्पा सुरू झाल्या. अचानक
गाडी घसरली आणि प्रत्येकीनं आपला पहिला ‘तसला’
अनुभव सांगायचा असं ठरलं.



 एकीनं सांगितलं शाळेत
असताना वर्गमित्राबरोबर तिचा पहिला ‘किस’
दुसरीने कॉलेजमध्ये असतानाचे आपल्या सिनिअरबरोबरचे
संबंध रंगवून सांगितले. तिसरीनं
आपल्यचा बिल्डिंगमधल्या एका मुलाबरोबर
केलेली मज्जा.
आता आली चौथीची वेळ. पण चौथीनं
अजूनपर्यंत काहीचं केलं नव्हतं. अगदी साधं ‘किस’ही केलं
नव्हतं कधी. तिनं तसं मैत्रीनीना सांगितल्यावर
त्या सगळ्या खूप हसल्या. त्यांनी तिला चिडवलं.
आणि विचारलं आर यु व्हर्जिन ?
त्या चौघी मैत्रिणी एक-दोन महिन्यांतून
एका रात्री कुणाच्या तरी घरी भेटायच्या. आणि छान
गप्पा मारायच्या. आताही भेटल्या. नेहमीच्याच गप्पा.
काम कसं चालूये, कुणाचं कुणाशी लफडं, कोणाच लग्न ठरलं
अशा गप्पा वाढत गेल्या. त्यापैकी एकीचं लग्न ठरलं
होतं म्हणून तिला लग्न, मधुचंद्राची रात्र, यावन
चिडवणं आणि चावट गप्पा सुरू झाल्या. अचानक
गाडी घसरली आणि प्रत्येकीनं आपला पहिला ‘तसला’
अनुभव सांगायचा असं ठरलं. एकीनं सांगितलं शाळेत
असताना वर्गमित्राबरोबर तिचा पहिला ‘किस’,

दुसरीने कॉलेजमध्ये असतानाचे आपल्या सिनिअरबरोबर
असलेले संबंध रंगवून सांगितले. तिसरीनं आपल्याच
बिल्डिंगमधल्या एका मुलाबरोबर
केलेली मज्जा आणि ऐनवेळी कामवाल्या मावशीने येऊन
केलेला पचका अशा गमतीजमती सांगितल्या.

आता आली चौथीची वेळ. पण चौथीनं अजूनपर्यंत काहीच
केलं नव्हतं. अगदी साधं ‘किस’ही केलं नव्हतं कधी. तिनं तसं
मैत्रिणींना सांगितल्यावर त्या सगळ्या खूप हसल्या.
ती अजूनही ‘व्हर्जिन’ आहे का म्हणून तिला चिडवलं.
अगदी, तू नॉर्मल आहेस ना? असंही विचारलं.

पण
तिला समजेना की, आपण ‘व्हर्जिन’ आहोत तर काय झालं?
म्हणजे एकतर तसा आवडावा असा कोणी भेटला नाही.
असं काही करायचा असतं, असा विचारच
करिअरच्या धावपळीत मनात आला नाही.
पण मैत्रिणींनी केलेली गंमत तिला जरा खुपलीच.. तिनं
ठरवलं.. आपण आयुष्यात सगळे अनुभव घेतले. मग
हा का नाही?. सगळे जण करतात मग का नाही ? आपण
जसे इतर अनुभव घेतले तसा हाही ‘एक अनुभव’ घेऊया.

म्हणून तिनं ठरवलं की आपण कुणाबरोबर तरी ’जायचच’.!
तिनं ऑफिसमधल्या सहकार्याला पकडलं.




‘भ्रमर’ म्हणून त्याची ख्याती. मुलींनी दाणे टाकले की आलं कबुतर असे
सगळे म्हणायचे. मग तिला वाटलं हे सोप्पं आहे. तिनं
स्वतहून गप्पा मारल्या त्याच्याशी. थोडं फ्लर्ट केलं.
स्वतहून हवा दिली. त्याला मिळायचा तो सिग्नल
मिळालाच.. मग काय त्यांचा शनिवारी डिनरचा बेत
ठरला. आठवडाभर तिनं एवढा विचार केला नाही.

त्यात येता-जाता त्याचे इशारे पाहून तिला तर
सगळीच मज्जा वाटत होती.
आणि आता एकदा एखादी गोष्ट
करायची म्हंटली की करायचीच, असा तिचा खाक्या.
त्यामुळे पाप -पुण्य, कर्म, नैतिकता सगळं पोतडीत
गुंडाळून तिनं टाकून दिलं. अखेरीस शनिवार आला.

दोघंही तिच्या आवडत्या हॉटेलमध्ये जेवायला गेले.
त्याने अगदी आठवडाभर तिच्या गप्पांमधून तिला अचूक
टिपलेलं. तिला आवडणारी लाल गुलाबाची फुलं तो घेऊन
आला. तिचं आवडतं परफ्यूम लावून आला. आजतर तिला खूश
करण्यासाठी त्यानं कशाचीही कसर ठेवली नाही.

तिचं आवडतं जेवण, डेझर्ट, त्याबरोबर त्याच्या गोड गोड
गप्पा. तिचं कौतुक. तिचं दिसणं, वागणं, हसणं. सगळं
किती मोहक. असं तो वारंवार तिला सांगत होता.
ती करिअर ओरिएण्टेड, शार्प म्हणून तिचं कौतुक केलं.

ती कशी इतर मुलींपेक्षा खूप वेगळी, म्हणून
आवडणारी आहे अशी स्तुतिसुमनं उधळली. तिला ते खोटं
असूनही आवडलं. कारण असं प्रथमच कोणी तरी अटेन्शन
देत होतं. पण त्याचवेळी तिला इतकं हसू येत होतं.
नेहमी नाक वर करून चालणारे पुरुष, बायकांना अक्कल
नाही, त्यांना कोण डोक्यावर बसवणार असं म्हणणारे

पुरुष; एखादी बाई आप्ल्याला पटावी म्हणून
कसा स्वत:चा स्वाभिमान गुंडाळून ठेवून
तिची खातिरदारी करतात, हे तिला दिसत होतं.
तो तिच्या शरीराचं, सौंदर्याचं कौतुक करत होता.
रात्र चढत होती. गप्पा रंगत होत्या. मग जेवण
झाल्यावर ते त्याच्या रूमवर गेले. त्यानं घरात तिचं
खूपच छान स्वागत केलं. पुन्हा थोड्या गप्पा.

मग हळूच
त्यानं स्लो, रॉमॅण्टिक गाणी लावली. दिवे मंद केले.
आता मात्र तिला टेन्शन आलं. आपण आलोत खरं इथवर, पण
आपल्याला जमेल ना असं तिला वाटायला लागलं. त्यानं
तिला डान्स करायला बोलावलं. ती जरा टेन्शनमध्येच.
गाण्यावर ते डान्स करत होते. पहिल्यांदाच
कुणाच्या इतक जवळ गेल्यामुळे तिच्या छातीचे ठोके
वाढत गेले. त्याचा श्वास तिला तिच्या गालावर,

मग मानेवर जाणवत होता. तिला स्वत:लाही खूप
काहीतरी वेगळं, गोड जाणवत होतं. त्यांच्यातलं अंतर
कमी होऊ लागलं. पण तिच्या मनात मात्र विचार येऊ
लागले.
हे ठीक आहे ना.? म्हणजे आपण हे जे काय करतोय ते काय
आहे, सिद्ध करणं आपण नॉर्मल आहोत हे.? ‘‘नॉर्मल
आहोत’’ म्हणजे.? आपण अजूनही व्हर्जिन आहोत म्हणून

कोणी आपल्याला चिडवू नये
म्हणून.? ..किंवा आपल्याकडेही असाच थ्रिलिंग अनुभव
असावा, तो इतरांना सांगता यावा म्हणून.?
त्यासाठी हा अनुभव असाच घ्यायला हवा का? आपण असं
कुणाला मुद्दाम भुरळ पडून, वापरून घेणं
किंवा स्वत:ला वापरू देणं योग्य आहे का?
तिच्या डोक्यात एवढे विचार आणि त्यानं तिला एकदम
जवळ घेतलं. तिच्या अंगावर एकदम शहारा. सरसर
डोक्यापर्यंत चमक गेली.
- आणि तिला अचानक आजीचे शब्द आठवले, ‘‘सगळे जण
सगळ्या गोष्टी करतात म्हणून आपणही तसंच
करायला हवं असं काही नसतं; एखादी कृती केल्यावर जर
आपण स्वत:ला आरशात बघू शकतो, स्वतला चेहरा दाखवू
शकतो याची खात्री असेल तर मग ती गोष्ट बिनधास्त
करावी. नाही तर नाही.!’- अचानक ती भानावर
आली. तिनं त्याला एकदम थांबवलं
आणि त्याला म्हणाली, ‘मला हे जमणार नाही.’
ती तिथून पळून गेली. रिक्षात बसल्यावर तिचं तिलाच
रडू आलं. आपण इतक्या खालच्या पातळीवर जात होतो ....

5 comments:

  1. अतिशय नाजूक विषय तुम्ही अत्यंत हळुवार पणे मांडला आणि तोही उत्कंठावर्धक पणे

    http://koorapat.blogspot.com/

    ReplyDelete
  2. एकदम बेस्ट।।।

    ReplyDelete
  3. छान अनुभव सांगितला

    ReplyDelete
  4. अगदी बरोबर.....पण लग्नाच्या बाबतित हे लागू आहे का?

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...