Wednesday, November 21, 2012

एक लघु कथा

 
सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्यावर
काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं.

आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर

तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक
करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.

न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं,;समुद्र किनारी इतके
हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू
शकणार आहेस??..

मुठभर मासे वाचवून
जगाला असा काय फ़रक पडणार आहे?

त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत
निरागसपणे उत्तर दिलं, यानं जगाला काय
फ़रक पडेल ते माहीत नाही.

पण
या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला?
ज्याचा मी नुकताच जीव वाचवला....!
.
.
संग्रहीत

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...