Monday, November 5, 2012

वाट बघणं...

वाट बघणं...

प्रत्येक जण बघतच असतो...
कुठल्या न कुठल्या गोष्टीची...
किंवा
कुठल्या न कुठल्या व्यक्तीची...
आणि बहुतेक वेळा माणूस वाट बघत असतो आपल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीची...


चिमुकली सोनू कामावरून येणाऱ्या आपल्या बाबांची..
दमून झोपलेला चिंटू आपल्या आई च्या हाथच्या मायेची..
तिची वायफळ बडबड ऐकण्यास आतुर झालेला प्रियकर आपल्या प्रेयसीची..
आणि कधी एकदा मनात साठवलेली ती वायफळ बडबड त्याला सांगते म्हणून आसुसलेली प्रेयसी आपल्या प्रियकराची..
दिवसभर घरकाम करून थकलेली बायको ऑफिस वरून येणाऱ्या आपल्या पतीची..

तर दिवसभर ऑफिसात काम करून कंटाळलेला पती 'आपल्या' घरी पोहोचण्याची..

का बघतो माणूस इतकी वाट...
कारण त्यात 'आशा' असते...
आपल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तींसोबत घालवता येणाऱ्या 'अमूल्य क्षणांची' आशा..

आणि लोकं उगाच असं समजतात की वाट बघत असतांना जो त्रास होतो, जी आतुरता वाटते ती त्या व्यक्तीच्या दूर असण्याने वाटते...
सत्य तर हे आहे की,

त्रास आपल्याला ती व्यक्ती दूर असल्याचा होत नसतो...
तर त्या व्यक्तीसोबत पूर्वी घालवलेल्या अमूल्य क्षणांच्या आठवणी ह्या खरं म्हणजे जास्त त्रास देत असतात.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...