Monday, January 10, 2011

माणूस ..!!

मला परमेश्वर भेटला

मी
त्याला सहजंच विचारलं
 
तु सगळ्यात चांगली गोष्ट
कुठली
बनवलीस ?
"माणसाचे मन"



आणि
सगळ्यात वाईट गोष्ट ?
"माणसाचे मन"

बाप्पा
मला पुढे म्हणाला.....
ऐक


मी एक कुबेर बनवला होता ...

त्याच्याकडे
जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची.


नंतर मी माणूस बनवला 

त्याचाही  वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची..........  


लक्षातठेव, 
एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो........... 
  
मनं जप , मनं जोड, माणसं मिळव.......
विचार
कर.........."

तेंव्हापासून

हे
वेड लागलंय...........

आज
एक एक करुन मोती जुळवतोय,
माणसं जोडतोय,  
खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर  
त्याला सांगण्यासाठी..!!

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...