Sunday, May 5, 2013

माझी कविता


रोजचं माझ्याशी प्रेमाने मनसोक्त बोलायची,

पाहून मला रोज गोड गोड हसायची..

कधी कधी माझी


वाट बघत थांबायची,

दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी नाही बोलायची..

ही पोरगी मात्र
माझी पाठ कधीचं नाही सोडायची..

तिच्या आयुष्यातल्या गमती जमती,

ती रोजचं मला सांगायची..

मी कधी नाही बोललो तर रड रड रडायची,

माझ्याशी रोजचं ती खुप खुप भांडायची..

मी नवी लिहिलेली प्रत्येक कविता,

सारखी मला वाचायला मागायची..

एकदा मला म्हणाली,

तू माझ्यावर कधीचं कविता करत नाही..

तेव्हा मला समजलं,

तिला माझी एकही कविता नाही कळायची..

तिला माझी एकही कविता नाही कळायची..

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...