Sunday, May 12, 2013

Happy Mothers Day

आज वाटते आई तुझ्या
जवळ येऊन बसावे |
मांडीवर डोक ठेऊन
तुझ्या शांतपणे निजावे |
 

घरापासून दूर म्हणून

शांत झोपच येत नाही |
तुम्हा सर्वांची आठवण
मला झोपूच देत नाही |

दिवस माझे सखे,
आणि रात्री वैरी होतात |
त्या एकांतात मला फक्त
चंद्र तारे साथ देतात |

प्रतेक तुटत्या ताऱ्याकडे
मी परतीचे मागणे मागतो |
शीतल त्या चंद्रामध्ये
मी तुझेच प्रतिबिंब पहातो |

आठवतो कधी तुझे संस्कार , कधी बाबांचा धाक |
कधी तुझी गोड ममता
आणि कधी बाबांचा राग |

पुन्हा एकदा रस्त्याने
तुझे बोट धरून चालावे |
चालताना लागली ठेच
तर तुझ्या आधाराने सावरावे |

आज वाटते आई
तू पुन्हा मला थोपटावे |
त्याच बोबड्या स्वरांत काही
माझ्या साठी गुणगुणावे |

1 comment:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...